
दापोलीत ७ महिन्यात १०१४ जणांना दंश, उपजिल्हा रूग्णालयाकडून योग्य ते उपचार.
दापोली तालुक्यामध्ये एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत १०१४ जणांना साप, विंचू, कुत्रे, मांजर, माशांनी दंश केल्याचे उपजिल्हा रूग्णालयाकडून समोर आले. या सार्यांवर योग्य ते उपचार करण्यात आले. मात्र सात महिन्यात कुत्र्याचा दंश होवून जखमी झालेल्यांची संख्या मोठी असल्याने भटक्या कुत्र्यांपासून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दापोली शहरासह ग्रामीण भागामध्येदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याबाबत गंभीररित्या कार्यवाही होत नसल्याचे समोर येत आहे. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ६५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले. यात काही बालकांचा समावेश असून या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर दुखापत देखील झाल्या आहेत.www.konkantoday.com




