
खेड शासकीय गोदाम दुरूस्तीचे काम रखडले
खेड शहरातील शासकीय गोदामाच्या दुरूस्तीसाठी ६७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर होवूनही गेल्या तीन वर्षापासून दुरूस्तीचे घोंगडे लालफितीतच अडकून पडले आहे. पडझडीनंतर शासकीय गोदाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. सद्यस्थितीत समोरीलच दुसर्या गोदामात रास्त दराच्या धान्याचा साठा केला जात आहे. या गोदामाची देखील दोन महिन्यापूर्वी पडझड झाली होती. दुसरे गोदाम देखील दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे रास्त दराच्या धान्याचा साठा करायचा कुठे, असा प्रश्नही महसूलच्या पुरवठा विभागाला सतावत आहे. www.konkantoday.com