
नाणार रिफायनरीआणि बारसु रिफायनरी मी हद्दपार करुन दाखवेल-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपतींचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही.सुरतमध्येही मी मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. घर फोडणारी औलाद तुमची. शरद पवारांचे घर फोडले. अडीच वर्षात मी काय गुन्हा केला होता. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकचं राज्य होतं. हे तेव्हा कुठे होते संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. आपण १० रुपयात थाळी सुरु केली होती. परत सत्तेत आल्यावर ती सुरु करणार आहे. महिलांसाठी १५०० रुपये देतात. पण त्यात घर चालतं का. महागाई किती वाढली आहे.‘महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना मोफत शिक्षण देणार. बदलापूरमध्ये जी घटना घ़डली जे तीन भाऊ आहेत त्यांनी त्या चिमुकलीच्या आईला १५०० रुपये देऊन दाखवा. त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं तुम्ही. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन आम्ही सुरु करु. सत्ता कशी आणायची, आमदार कसे फोडायचे हेच सुरु आहे. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर अनेक उद्योग महाराष्ट्रात सुरु झाले असते. नाणार रिफायनरीआणि बारसु रिफायनरीमी हद्दपार करुन दाखवेल. जनतेच्या माथ्यावर प्रकल्प लादताय. महाराष्ट्राचं नाव कोणाचं राहणार आहे. मोदी आणि शाहांचं नाव असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करणार.’ असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.ठाकरे म्हणाले की, ‘मोदी शाहांच्या दारात आम्ही उभं राहायचं का. ज्यांनी भाजप रुजवला त्यांची आता गरज यांना नाहीये. भाजपचे अध्यक्ष म्हणतात की संघाची आता आम्हाला गरज नाही. विदर्भात कापसावर एक रोग येतो. तो खोडाला लागतो. तसा हा दाढीवाला किडा भाजपला लागला आहे. जो भाजपला पोखरतोय.’महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आली आहे. ठाकरे यांनी शिंदे सेनेचे उदय सामंत यांचा भूत असा उल्लेख केला. २०१४ मध्ये सामंत यांनी मी निवडून येतो, मंत्रिपद देणार का असे विचारलेले, तेव्हा मी त्यांना शब्द दिलेला. २०१४ मध्ये देऊ शकलो नाही. परंतू, २०१९ मध्ये मला तो दिलेला शब्द आठवला आणि मी त्यांना मंत्री केले. उदय सामंत यांनी गद्दारी केली, तिकडे उद्योग मंत्री झाले. त्यांनी जिल्ह्यात किती उद्योग आणले असा सवाल करत ठाकरेंनी उदय सामंतांचे घरातील सोडा बाहेरील किती उद्योग आहेत, असा टोला लगावला. याचबरोबर ठाकरे यांनी राजन साळवींविरोधात उभे असलेल्या किरण सामंत यांना पैशाची मस्ती असल्याची टीका केली. पार अगदी मुंबईतही या लोकांनी बॅनर लावलेले, असे म्हटले. एक बातमी वाचली की ८ तारखेला सुनावणी लावली आहे. न्यायदेवतेला दिसते की नाही हे आठ तारखेला कळेल. मी न्यायाधीशांना हात जोडून सांगतोय आम्ही अडीच वर्षापासून न्याय मागतो आहे. असा पक्ष फोडून लोकं जायला लागले तर लोकशाहीवर जनतेचा विश्वास राहणार नाही. शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार आहे.