
खेड-दापोली मार्गावर मिरजला जाणाऱ्या एसटी बसला कुवे घाटात अपघात.
कुवे घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. खेड-दापोली मार्गावर असलेल्या कुवे घाटात दापोली मिरज एसटी बस 20 फूट खोल कोसळली आहे.या अपघातामध्ये बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर गंभीर जखमी झाले आहेत, तर 15 ते 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.खेड-दापोली मार्गावर मिरजला जाणाऱ्या एसटी बसला कुवे घाटात अपघात झाला. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. कुवे घाटात तब्बल 20 फूट खाली बस कोसळली, या बसमध्ये एकूण 20 प्रवासी होती, यातल्या 15 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्यारुग्णवाहिकेने जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.