
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात महिन्यापूर्वी कोसळलेली दरड अद्यापही तशीच.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेली दरड आता पावसाळा संपला तरी राष्ट्रीय महामार्गने पूर्णपणे हटविलेली नाही. घाटातील दरीच्या बाजूला रस्ता खचल्याने एक लेन बंद करण्यात आले आहे आणि दुसर्या लेनवरून वाहतूक सुरू केली असताना देखील कोसळलेली दरड हटविण्यास महामार्ग विभागाला अद्यापही वेळ मिळालेला नाहीमहिनाभरापूर्वी चिपळूणकडून मुंबईकडे जाताना एका मोरीच्या शेजारील संरक्षक भिंत कोसळली आणि काँक्रिटच्या रस्त्याखालील मातीदेखील निखळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी विशिष्ठ भागातील एक लेन बंद करण्यात आली आणि वाहतूक दरडीच्या लगत जाणार्या रस्त्याकडून वळविण्यात आली.पावसाळ्याच्या सुरुवातीला याच घाटात दरड कोसळली होती. यानंतर या लेनवरील वाहतूक दरीकडील बाजूने वळविण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने कोसळलेली दरड अद्याप पूर्णपणे हटविलेली नाही. त्यामुळे खेडकडून चिपळूणकडे येणार्या वाहतुकीला अस्तित्त्वात असलेली लेन अपुरी पडत आहे.