
मुंबई-गोवा महामार्गावरील खोपीफाट्यानजिक जनावरे वाहतुकीतील सात लाखाचा टेम्पो जप्त.
मुंबई-गोवा महामार्गावरील खोपीफाट्यानजिक गस्तीदरम्यान पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जनावरे वाहतूक करणार्या समीर अशोक पवार (३४) याला रंगेहाथ पकडले. गुरे वाहतुकीसाठी वापरलेला सात लाख रुपये किंमतीचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.समीर पवार हा महिंद्रा पिकअप टेम्पोतून (एम.एच.०६/बीजी-३६२२) जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना व वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र नसतानाही एक मोठी म्हैस व दोन रेड्यांना त्रास होईल अशा स्थितीत दाटीवाटीने डांबून वाहतूक करत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. एकूण ६० हजार रुपये किंमतीची गाभण म्हैस आणि ४० हजार रुपये किंमतीचे दोन रेडे हौद्यात बंदिस्त करून ठेवण्यात आले होते.गस्तीदरम्यान टेम्पोची झडती घेण्यात आली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात महिला पोलीस शिपाई तेजस्वीनी जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करीत आहेत. www.konkantoday.com