
उदय सामंत यांची ताकद वाढली, जिजाऊ संघटनेचे युवा नेते प्रथमेश गावणकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश.
रत्नागिरी तालुक्यात जिजाऊ संघटना या सामाजिक संघटनेचे काम करणारे युवा नेते प्रथमेश गावणकर यांनी आज शिंदे सेनेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला गेले अनेक वर्ष गावणकर हे जिजाऊ या संस्थे मार्फत तालुक्यात सामाजिक काम करीत आहेत मात्र त्यांनी आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यानी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिंदे सेनेत प्रवेश केला त्यामुळे या मतदारसंघात सामंत यांची ताकद वाढण्यास मदत झाली आहे प्रथमेश गावणकर यांना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख म्हणून नेमणूक देण्यात आली आहे यावेळी बाबू म्हाप व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते