
रेवस रेड्डी सागरी मार्गामुळे आंबोळगड पर्यटनाला मिळणार चालना.
शासनातर्फे रेवस रेड्डी सागरी मार्ग उभारण्यात येणार असून हा मार्ग सागर किनारपट्टीवरील गावांमधून जाणार आहे. त्यामध्ये पर्यटकांची पसंती मिळत असलेल्या आंबोळगड गावाचा समावेश आहे. या विकास केंद्राच्या माध्यमातून आंबोळगडसह परिसरातील पर्यटनाला भविष्यात चालना मिळणार आहे.या मार्गामुळे कोकणातील समुद्र किनार्यावरील गावे आणि शहरे एकमेकांना जोडली जाणार असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. रेवस रेड्डी सागरी मार्गाची उभारणी करताना गावांमध्ये विकास केंद्र उभारून शासनातर्फे तेथील पर्यटनाला अधिक चालना देण्यात येणार आहे.www.konkantoday.com