ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवा- रवींद्र चव्हाण.

शिवसेना शिंदेगटाचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (शुक्रवार, २५ ऑकटोबर) रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीबाबत मोठे वक्तव्य केले. भाजप कार्यकर्त्याना महायुतीसाठी रात्रीचा दिवस करत काम करण्याचे आवाहन करत, “जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळाली नाही तरी भाजपचा कार्यकर्ता महायुती सोबत राहिला हे सांगता आलं पाहिजे त्यासाठी वीस तारखेपर्यंत रात्रीचा दिवस करा,” असे ते म्हंटले आहेत.रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले, “महायुतीच्या घटक पक्षाने एकत्र घेऊन आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. मनात एक ओठावरती एक आणि प्रत्यक्षात एक असं चालणार नाही. प्रत्येकाला न्यायाची भूमिका ही महायुतीची मोठी शक्ती आहे. मोठे निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. एकत्र ताकद निर्णय करू शकते हे लक्षात ठेवा. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३५२ बूथ आहेत. या बुथवर ७० टक्के पेक्षा जास्त मतदान कसे होईल याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. समन्वय नसल्यामुळे मतभेद निर्माण झाले असतील. असं असलं तरी पण महायुतीचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे. समन्वयामध्ये जरा देखील चूक झाली तर मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल,” असे ते म्हणाले.रवींद्र चव्हाण यांनी बाळा माने यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका करत ते पुढे म्हणाले, “शिवसेनेला एकूण उमेदवारी दिली. भाजपच्या उमेदवाराला येथून डावलले, यावर चर्चा होऊ शकते. आपल्या विचारांच्या विरोधात गेला आहे हे डोक्यात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काम करावं. ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवा. जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळाली नाही तरी भाजपचा कार्यकर्ता महायुती सोबत राहिला हे सांगता आलं पाहिजे. महायुतीच्या समन्वयामुळेच नारायण राणे यांचा विजय लोकसभेत झाला. निवडणूक जिंकून आणण्यासाठी एकोपा महत्त्वाचा आहे. वीस तारखेपर्यंत रात्रीचा दिवस करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button