
डिसेंबरमध्ये भाजपाला मिळणार नवीन अध्यक्ष! या नावांची चर्चा सुरू!!
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भाजपा आपल्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. भाजपचे नवे अध्यक्ष कोण असतील, याबाबत चर्चांना उधाण आले असून काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिने भाजपामधील संघटनात्मक बांधणीसाठी महत्वाचे मानले जात आहेत.*भारतीय जनता पक्षाला लवकरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना जून 2024 पर्यंतच मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे भाजपामध्ये नवे अध्यक्ष निवडीसाठी सध्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. जे. पी. नड्डा यांना केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणे त्यांना शक्य होणार नसल्याने डिसेंबरपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड होऊ शकते.1 ऑगस्टपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी अगोदर 15 सप्टेंबरपर्यंत सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली आहे. त्यानंतर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सक्रिय सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. सक्रिय सदस्यत्व मोहिमेची पडताळणी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरच प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे माहिती मिळत आहे. भाजप मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्षांची अधिकृतपणे निवड केली जाणार आहे.भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मनोहरलाल खट्टर, देवेंद्र फडणवीस, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान आणि नरेंद्र सिंह तोमर यांची नावे चर्चेत आहेत.