
दहशतवादविरोधी पथकाकडून कारवाई झालेल्या संशयित आरोपी मुवान रियाज पाटणकर याचे चायनीज दुकान बंद करण्याची मागणी.
इसिस’ला पैसे पुरविल्याच्या संशयाखाली चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशतवादविरोधी पथकाकडून कारवाई झालेल्या संशयित आरोपी मुवान रियाज पाटणकर याचे संगमेश्वर परिसरातील चायनीज सेंटर असल्याचे समोर आले आहे.हे दुकान संबंधित प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत बंद करण्यात यावे, याबाबतचे निवेदन संगमेश्वर व्यापारी संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने संगमेश्वर पोलिसांना देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सावर्डे येथील पाटणकर याचे संगमेश्वर सह्याद्री पॅलेस येथे चायनीज हॉटेल आहे. परंतु, या व्यक्तीवर दहशतवादविरोधी पथकाने जी कारवाई केली आहे, त्याअर्थी ही व्यक्ती व्यवसायातून मिळवलेला पैसा हा देशविरोधी कारवाईकरिता खर्च करत आहे. त्यामुळे संगमेश्वर येथील व्यवसाय प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत या व्यक्तीचे चायनीज खाद्याचे दुकान बंद ठेवावे व ही व्यक्ती दोषी आढळल्यास त्याचा व्यवसाय कायमचा बंद करावा. या निवेदनावर संगमेश्वर व्यापारी संघ तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संगमेश्वर विभागपदाधिकारी आणि सदस्यांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.