
संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला मिळाला भाकर मित्र पुरस्कार
रत्नागिरी : गेली सात वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला सन 2024 चा मानाचा भाकर मित्र पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथील पी एस आय पवन कांबळे, गोगटे कॉलेज चे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ आर ए सरतापे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते,भाकर संस्थेच्या अध्यक्षा मंगल पोवार, संस्थापक देवेंद्र पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते,सभासद , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते