
रायगडातही आता रिफायनरीविरोधात कोकण वाचवा मोहीम
रत्नागिरी ः नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात चणेरा येथे होणार असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध होताना दिसत आहे. रिफायनरीच्या विरोधात चाळीस गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी नुकतीच बैठक घेवून या प्रकल्पाला विरोध करत रॅली काढून काळे झेंडे दाखवत शासनाचा निषेध केला. यामुळे रिफायनरीचे रायगडमधील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे