
तालुका खो खो अजिंक्य पद पालीकडे
मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली च्या 19 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलांच्या खो खो संघांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेते पद प्राप्त केले या स्पर्धेत प्रथम ज.न.म नाणीज कॉलेजचा, नंतर फाटक कॉलेजचा पराभव करून अंतिम फेरी गाठली .
अंतिम फेरी मध्ये गतविजेता अभ्यंकर कुलकर्णी ( गोगटे ) कॉलेज चा पराभव करून विजेतेपद* प्राप्त केले. तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने सुद्धा उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पहिल्या सामन्यामध्ये खेडशी हायस्कूलचा तर दुसऱ्या सामन्यामध्ये जागुष्टे हायस्कूलचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
नाणीज हायस्कूल बरोबर झालेला अंतिम सामन्यामध्ये प्रशाळेला. उपविजेतेपद* प्राप्त झाले आहे 19 वर्षाखालील स्पर्धेमध्ये *उत्कृष्ट संरक्षक* म्हणून प्रशालेतील *कुमार विपुल शैलेश पर्वते* इयत्ता बारावी-( ब) याची निवड झाली आहे . तर *कुमार शिवम गणपत ताम्हणकर* इयत्ता 12 वी (अ ) याची *अष्टपैलू खेळाडू* म्हणून निवड झाली आहे. त्याचप्रमाणे 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेमध्ये *उत्कृष्ट आक्रमक* म्हणून इयत्ता दहावी ( ड) मधील विद्यार्थी *कुमार युवराज विश्वास पवार* याची निवड झाली आहे. दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी *वालावलकर ट्रस्ट क्रीडा नगरी डेरवण* येथे होणाऱ्या *जिल्हास्तरीय शालेय खो खो* स्पर्धेमध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली चा 19 वर्षाखालील संघ *रत्नागिरी तालुक्याचे* प्रतिनिधित्व करणार आहे