
घाटातील अवघड वळणावर अवजड वाहनांना घडणार्या अपघातांमुळे वाहन चालकांची सुरक्षितता धोक्यात
. भोस्ते घघाटातून वाहनचालकांचा गतीमान झालेला प्रवास ही दिलासादायक बाब असली तरी घाटातील अवघड वळणावर अवजड वाहनांना घडणार्या अपघातांमुळे अन्य वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या आजवरच्या उपाययोजना कुचकामी ठरल्याने वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेल्या ६ महिन्यात वळणावर अवघड वाहनांचे २५ अपघात घडले आलेत. अपघातांच्या मालिकांमुळे संरक्षक भिंतीची मोडतोड होत आहे. तरीही प्रशासन सुस्त आहे.भोस्ते घाट यापूर्वी अपघातांच्यादृष्टीने शापित बनला होता. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरण दरम्यान भोस्ते घाटातील अवघड वळणाच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. चौपदरीकरणानंतर वाहनचालकांचा प्रवासही सुसाट झाला तसेच अपघातांचे विघ्न दूर होण्याच्या शक्यतेने वाहनचालकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र या आशेवर पाणी फेरले आहे. चौपदरीकरणानंतरही भोस्ते घाटात अपघातांची मालिका आजमितीस कायम आहे.वळणावरील अपघात रोखण्यासाठी १३ गतिरोधकांसह संरक्षक भिंतीवर करण्यात आलेला टायर तंत्रज्ञानाचा अवंबही फोल ठरला आहे. वळणावरील गतिरोधक उखडत असल्याने वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा सिलसिला कायम आहे. विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांनाच घडणार्या अपघातांमुळे अन्य वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी कायम आहे. www.konkantoday.com