
खेड तालुक्यातील माणी-शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायीसह वासराचा मृत्यू.
खेड तालुक्यातील माणी-शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजेश बावदाने यांच्या मालकीच्या गोठ्यातील गायीसह पाड्याचा मृत्यू झाला.सकाळी गुरे चरण्यासाठी घेवून जाण्याकरिता ते गोठ्यात गेले असता त्यांना रक्ताचा सडा पाहून धक्काच बसला. चार दिवसांपूर्वीच कुळवंडी येथे एका शेतकर्याच्या चार बकर्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने वनविभागाने याबाबत बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.www.konkantoday.com