
मालगुंड जोशीवाडी येथे आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांचे वतीने उपकेंद्र गणपतीपुळे अंतर्गत मालगुंड जोशीवाडी येथे असंसर्गिक आजाराची तपासणी शिबीर घेण्यात आले या वेळी गणपतीपुळे उपकेंद्र च्या cho श्रीम. मनाली तारवे व cho श्रीम. गीतांजली मायशेट्ये यांनी नागरिकांची तपासणी केली आरोग्य सेविका श्रीम. अश्विनी गोवळकर यांनी रक्ताच्या तपासण्या केल्या या वेळी आशा सेविका श्रीम. समीक्षा मेने व सुजाता मांडवकर यांनी त्याना सहकार्य केले आरोग्य सेवक श्री. किरण झगडे यांनी औषध वाटप केला या शिबिरात परिसरातील 58 नागरिकानी तपासणी करून घेतली हे शिबीर जोशीवाडी येथील नवरात्र उत्सव मंडळाचे वतीने लावण्यात आले होते. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन दुर्गवली, राजा दुर्गावली तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हे शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव व डॉ. सुनीता पवार यांचे मार्गदर्शना खाली घेण्यात आले.