
खेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वसंत उर्फ आबा सोमा बंडबे यांचा विजय.
खेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वसंत उर्फ आबा सोमा बंडबे यांनी 9 विरुध्द 4 मतांनी प्रभारी सरपंच मानसी मंगेश पेडणेकर यांचा दारुण पराभव केला. पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न चे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख बाबू म्हाप व त्यांच्या सहकार्यांनी खेडशी ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील या मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने कायम ठेवत उबाठाला धोबीपछाड दिला.खेडशी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांनी अडीच वर्षानंतर आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदाचा कारभार प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच मानसी मंगेश पेडणेकर या पहात होत्या. शुक्रवारी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार रिध्दी गौरे यांनी काम पाहिले.