
आजचा हल्लाबोल मोर्चा रद्द
रत्नागिरी ः गिरणी कामगार कृती समितीच्यावतीने वांद्र्रे येथील म्हाडाच्या मुख्य कार्यालयावर आज हल्लाबोल मोर्चा नेण्यात येणार होता. गिरणी कामगारांच्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या असून मुंबईमध्ये घर उपलब्ध व्हावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी कृती संघटनेच्या नेत्यांची बैठक घेवून सर्व प्रश्नांवर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हा हल्लाबोल मोर्चा रद्द करण्यात आला