
नसबंदीमध्ये पुरूष अजूनही मागेच
रत्नागिरी ः लहान कुटुंब, सुखी कुटुंब ही संकल्पना राबविण्यासाठी नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता नसबंदी शस्त्रक्रियांमध्ये अजून पुरूष मागे असून फारसे पुरूष ही शस्त्रक्रिया करण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस अशा शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण घटत आहे. गेल्या पाच वर्षाचा विचार करता केवळ १५८ पुरूषांनी अशा शस्त्रक्रिया केल्या आहेत. स्त्रियांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली तर त्यांना २५० रु. देण्यात येतात. तर दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांना ६०० रु. दिले जातात. मात्र पुरूषांसाठी शस्त्रक्रिया केली तर १४०० रु. देण्यात येतात. असे असले तरी नसबंदीकडे पाहण्याचा पुरूषांचा अजूनही नकारात्मक दृष्टीकोन आहे.