
सिंधुदुर्गात ठेकेदारांच्या बाऊन्सरना शिवसैनीकांनी दिला चोप
सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचे साडेसात कोटींचे टेंडर मिळण्यासाठी थेट जिल्हा परिषद बांधकामच्या कार्यालयात बाऊन्सर बसवून कार्यालयात येणार्या सर्वसामान्य नागरिक व ठेकेदार यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सोमवारी पहिल्यांदाच घडला.ही बाब ठाकरे शिवसेनेला समजताच आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी बांधकाम विभागात आक्रमकपणे घुसत जाब विचारला. यावेळी ठाकरे शिवसेना पदाधिकार्यांचा संताप पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या चार बाऊन्सरना पोलिस व शिवसैनिकांनी पकडत जोरदार चोप दिला, तर आणखी चारजण पसार झाले. कार्यालयीन कामकाज सुरू असताना हा राडा घडल्याने जिल्हा परिषद भवन परिसरात दिवसभर वातावरण तंग होते.