
भोस्ते घाटातील अनोळखीचा मृतदेह प्रकरण गुंतागुंतीचे, स्वप्न पडलेल्या तरूणाच्या जबानीत विसंगती.
खेडमधील भोस्ते घाटातील अनोळखीचा मृतदेह आणि त्या प्रकरणाशी संबंधित सावंतवाडील तरूणाला पडलेले स्वप्न प्रकरणाचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात त्या तरूणाच्या जबाबातील विसंगती आता समोर येवू लागली आहे. त्या मृतदेहाच्या शोधासाठी त्याचा झालेला प्रवास, पोलिसांत दिलेली खबर आणि आता नव्याने तो तरूण एकतर्फी प्रेमाच्या मानसिक प्रभावाखाली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्या तरूणाची मानसोपचार तज्ञांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.योगेश पिंपळ आर्या (३०, रा. सावंतवाडी, आजगांव) या सावंतवाडीतील तरूणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेड-भोस्ते घाटातील अनोळखी मृतदेहाचा उलगडा झाल्याचा अचंबित करणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. www.konkantoday.com