
मुसळधार पावसाचा फटका, पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द! पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे (25 सप्टेंबर) वाहतूक कोंडीत मुंबईकर तासनतास अडकले. त्यात रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचा परतीचा मार्ग बंद झाला.
*🌧️ रस्त्यांवर मोठा वाहतूक कोंडी आणि रेल्वे ट्रॅकवर भरलेलं पाणी यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. दरम्यान आज 26 सप्टेंबरला हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.त्याशिवाय बिहार, नेपाळ, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरातमधील काही भागांमध्येही तुफान पावसाची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ते विविध विकासकामांचं लोकार्पण करणार होते.