
स्वच्छता अभियानांतर्गत वेळास समुद्रकिनारी स्वच्छता
मोहीमस्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद, महसूल विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती, ग्रामपंचायत वेळास, पंचक्रोशीतील हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा आदींच्या संयुक्त विद्यमाने वेळास समुद्र किनार्याची स्वच्छता करण्यात आली.मी घाण करणार नाही आणि इतरांनाही घाण करू देणार नाही, ही शपथ सर्वांनी पाळावी. परिसर स्वच्छतेत सातत्य ठेवा असे आवाहनही यंत्रणेच्यावतीने या निमित्ताने करण्यात आले. www.konkantoday.com