
बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्यांसाठी नवा कडक कायदा येणार
मत्स्य क्षेत्रात स्पर्धेमुळे अधिक मासळी मिळावी यासाठी एलईडी दिवे लावून मच्छीमारी करण्याचे प्रकार घडत असून याबाबतपारंपरिक मच्छीमारांनी आवाज उठवला होता शेवटी याबाबत शासनाने लक्ष घातले आहे एलईडी दिवे लावून मच्छीमारी करणाऱया बोटींवर एक लाख रुपये दंड व बोट जप्त करणारा नवीन कडक कायदा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली