
कोकण रेल्वे मार्गावरील आडवली स्टेशन नजिक रेल्वेतून पडल्याने तरूण जखमी.
कोकण रेल्वे मार्गावरील आडवली स्टेशन नजिक ट्रेनमधून पडल्याने तरूण गंभीर जखमी झाला. ही घटना १५ सप्टेंबर २०२४ रोजी घडली. रामसजीवन बैगा (२४, रा. शिरोली, मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामसजीवन बैगा हा १५ सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावरील गाडीने प्रवास करत होता. सकाळी तो आडवली येथे रेल्वे स्टेशन येथे जखमी अवस्थेत आढळून आला. www.konkantoday.com