
हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा करणार्या पाकिस्तानची विनाशाकडे वाटचाल ः डॉ. परिक्षित शेवडे
रत्नागिरी ः हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा करणार्या पाकिस्तानचा कायम पराभवच झाला असून पाकिस्तानचेच तुकडे होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानची विनाशाकडून विनाशाकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन लेखक डॉ. परीक्षित शेवडे यांनी केले.
डॉ. सच्चिदानंद शेवडे व सुपुत्र डॉ. परीक्षित शेवडे यांच्या पाकिस्तान-विनाशाकडून विनाशाकडे या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच कर्हाडे ब्राह्मण संघातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. सुभाष देव यांच्या हस्ते झाले.