
दीपावली सुट्टीच्या हंगामात कोकण मार्गावर धावणाऱ्या दिवाळी फेस्टीव्हल स्पेशल गाड्या जाहीर.
दीपावली सुट्टीच्या हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळी फेस्टीव्हल स्पेशल जाहीर केल्या आहेत.यात एलटीटी- सावंतवाडी, सावंतवाडी – पनवेल, एलटीटी- कोच्युवेली या फेस्टीव्हल स्पेशलचा समावेश आहे. यातील एलटीटी- कोच्युवेली फेस्टीव्हल वगळता अन्य ३ फेस्टीव्हल स्पेशल गाड्यांचे आरक्षण ११ सप्टेंबरपासून खुले होणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.०११७९/०११८० एलटीटी-सावंतवाडी फेस्टीव्हल स्पेशलच्या ८ फेऱ्या धावणार आहेत. १८, २५ ऑक्टोबर, १ व ८ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल.०११७५/०११७६ पुणे-सावंतवाडी फेस्टीव्हल स्पेशलच्या ८ फेऱ्या धावणार आहेत. २२, २९ ऑ क्टोबर व ५, १२ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणारी स्पेशल पुणे येथून सकाळी ९.३५ वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.३० वा. सावंतवाडी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात २३, ३० ऑक्टोबर व ६, १३ नोव्हेंबरदरम्यान बुधवारी धावणारी स्पेशल सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १२.१५ वाजता पुणे येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल.०११७८/०११७७ क्र.ची सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल २२, २९ ऑक्टोबर व ५, १२ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी धावेल. सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वा. पनवेल येथे पोहचेल.