
कोकणातील शक्ती तूरा’ लोककला मुंबईतील कलारंग ग्रुपने दादर स्टेशनवर सादर केली
. गणोशोत्सवादरम्यान तुम्हाला कोकणातील घराघरातून जाखडी नृत्याचा आवाज कानावर पडतो ज्याला कोकणात शक्ती तुरा असे देखील म्हटलं जातं. आज ही कला संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाली आहे. शक्ती तूरा ही कोकणातील पारंपरिक कला आहे. शक्ती म्हणजे पार्वती आणि तुरा म्हणजे महादेव. या दोघांतील संवाद म्हणजे शक्ती तूरा. वडिलोपार्जित जाखडी नृत्याची ही कला कोकणातील तरुण मंडळी जोपासत आहे.ही ‘शक्ती तूरा’ लोककला मुंबईतील कलारंग ग्रुपने दादर स्टेशनवर सादर केली आणि रेल्वेस्टेशनवरील प्रवाशांचे मनोरंजन केले. व्हिडीओमध्ये पाहून शकता की, पारंपारिक वेषभूषेमध्ये काही तरुणी पारंपारिक वेषभूषेमध्ये नृत्य करताना दिसत आहे तर मधोमध तबला आणि ढोलकी वाजवणारे वादक बसलेले दिसत आहे. सर्व प्रवाशांनी ही नृत्य पाहण्यासाठी गर्दी केली आहे. काही लोक मोबाइलमध्ये व्हिडिओ शुट करताना दिसत आहेत. आपल्या कोकणातील लोककला पाहून गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत आहे.




