
शेतीसाठी बैल वापरामध्ये लांजा तालुका अग्रेसर.
जिल्हयात बैलांचा शेती क्षेत्रासाठी वापर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याची आकडेवारी नोंदवली आहे. राज्यात १०० हेक्टर पेरणी क्षेत्रामध्ये २४ बैल वापरण्यात येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यात ती संख्या ३९ एवढी आहे.खरीप तसेच रब्बी पिकांसाठी मशागत करून नंतर पेरणी, लागवड करण्यात येते. गो वंशाच्या जनावरांचा वापर दर शंभर हेक्टर मागे मंडणगडात २८, दापोलीत २६, खेडमध्ये २९, चिपळूणमध्ये ४०, गुहागरात ४०, रत्नागिरीत ४७, संगमेश्वरात ४३, लांजात ५०, राजापुरात ४६, जिल्ह्यात एकूण सरासरी ३९ तर राज्यात २४ एवढे प्रमाण आहे.www.konkantoday.com