
गणेशभक्तांसाठी सप्टेंबर महिन्यात रेल्वेने मोठं गिफ्ट दिलं.
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले असताना चाकरमान्यांचे अर्धे लक्ष हे तिकिटांच्या वेटिंग लिस्टवर असचे. कोकणात जाण्यासाठी तिकिट मिळणं हे खूप कठिण आहे.गणेशभक्तांसाठी सप्टेंबर महिन्यात रेल्वेने मोठं गिफ्ट दिलं आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. दरवर्षी सात लाख लोक मुंबईहून कोकणात आपल्या मुळगावी जात असतात. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी 300 गणपती स्पेशल ट्रेनची मागणी केली होती. मात्र, भारतीय रेल्वेने भक्तांची सुविधा पाहता 342 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.