
आयआयटी जेईई परीक्षेत हिरेन बावस्कर देशात चौथा
दापोली ः नेरूळ (प.) डीएव्ही पब्लिक स्कूलच्या हिरेन बावस्कर याने नुकत्याच झालेल्या आयआयटी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत आरक्षित वर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
त्याचे वडील अनिल बावस्कर देखील मुंबईच्या आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. तर आई डॉ. रंजना या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाची उद्यानविद्या शाखेची सुवर्णपदक विजेती. पदव्युत्तर विद्यार्थीनी आण मंगलोर येथील कृषिशास्त्र विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती पी.एच.डी. विद्यार्थीनी आहेत. दापोलीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापिका स्व. प्रभावती जालगावकर यांचा हिरेन हा नातू आहे.