आता पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेनत पाटील कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती.अशातच आता चेनत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.याप्रकरणातील अन्य आरोपी जयदीप आपटे हादेखील सध्या फरार आहे. जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले होते, त्यावेळी त्याच्या घराला टाळे होते. यानंतर पोलिसांनी माहेरी गेलेल्या जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशी केली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने गुरुवारी जयदीप आपटेच्या घराबाहेर निदर्शन केली. त्यामुळे आता पोलीस जयदीप आपटेला कधी पकडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.चेतन पाटील याला आता मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट असून त्याच्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता, त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन देण्यात आले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याचे चेतन पाटील याने अगोदरच स्पष्ट केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button