
पिअर कॅप तोडण्यासाठी अजून तीन महिने लागणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातून जाणार्या उड्डाणपुलाच्या पिलर कॅम्प तोडण्याचे सुरू असलेल्या कामाला अजून तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एकीकडे तोडफोड सुरू असतानाच दुसरीकडे पायलिंगचे कामही हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत २४३ पायलिंगचे काम पूर्णत्वास गेले आहे. मागील तीन अपघाताच्या घटनेनंतर रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेटस उभारून सुरक्षितपणे काम केले जात आहे.पेढे, परशुराम ते खेरशेत या चिपळूण टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले तरी शहरातून जाणार्या उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. उड्डाणपुलाच्या कामात तीन वर्षापासून सातत्याने अडचणी येत आहेत. या पुलासाठी सुरूवातीच्या आराखड्यानुसार एकूण ४६ पिलर उभारण्यात आले होते. त्यानंतर पुढील कामाला वेग घेत असतानाच १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा बहाद्दूरशेखनाका येथे काही भाग कोसळला होता.www.konkantoday.com