
नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
सिंधुदुर्ग : नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. एक वर्ष पूर्ण झाले नसल्याने या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात आहे.*नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होते. नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून वर्ष झाले नाही तर कोसळला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.




