लाडकी बहिण योजनेच राजकारण करुन समाजात द्वेष पसरवण्याच काम विरोधक करतायत.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहिण योजनेच राजकारण करुन समाजात द्वेष पसरवण्याच काम विरोधक करतायत. बदलापुरची घटना घडल्यानंतर आम्ही सगळ्या लोकांनी मिळून घटनेची गंभीर दखल घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू.कुठल्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही. हे सरकार संवेदनशील आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “विरोधकाचं काय चालू आहे? राज्यात काहीतरी भंयकर घडवण्याचा प्रयत्न आहे. कोणी म्हणतं बांग्लादेश होईल. पुरोगामी महाराष्ट्रात आहे हा. मतांसाठी, सत्तेसाठी एवढ्या खालच्या पताळीवर जाऊन प्रचार करता. तुम्ही संवेदनशील असाल, तर या दुर्देवी घटनेच राजकारण बंद करायला पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.महाराष्ट्र बंद काय करता? हे राजकारण बंद करा. कोर्टाने देखील या बंदला बेकायदेशीर ठरवलय. कोर्टाने म्हटलय अशा बंदला परवानगी देता येणार नाही. ही कोर्टाने हाणलेली चपराक आहे. मागे सुद्धा कोर्टाने दंड लावलेला, त्यातून सुधरा” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं.‘माझ्या बहिणी सावत्र भावांना…’“या दुर्देवी घटनेच राजकारण बहिणी कधीही खपवून घेणार नाहीत. हा विश्वास आम्हाला आहे. महाराष्ट्रात जे सत्तेला हपापलेले आहेत, ते बंदच्या निमित्ताने कायद-सुव्यवस्था बिघडवण्याच काम करतायत. हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. जनतेला वेठीस धरु नका” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “1500 रुपये हे आमच्या बहिणीच्या खात्यात टाकले, तर एवढी पोटदुखी का? माझ्या बहिणी सावत्र भावांना जोडा दाखवल्याशिवायराहणार नाहीत” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button