
मोराच्या शिकार्याचा अद्याप उलगडा नाही
खेड तालुक्यातील सुकिवली-कर्टेल मार्गावर मोराची शिकार होत असल्याची बाब समोर आल्यानंतर शिकार्याचा वनविभागाने शोध सुरू केला आहे. मात्र अजूनही मोराच्या शिकार्याचा उलगडा झालेला नाही. या शिकार्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने गुप्त यंत्रणेचीही फिल्डींग लावली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुकिवली-कर्टेल मार्गावर मोराची शिकार होत असल्याची बाब एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत सतर्क झालेल्या वनविभागाच्या पथकाने मोराच्या शिकार्याचा शोध जारी केला आहे. लगतच्या गावातील हा शिकारी असल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार वनविभागाच्या पथकासह ग्रामस्थांनीही सापळा रचला आहे. मात्र अद्याप त्या शिकार्याचा सुगावा लागलेला नाही. www.konkantoday.com