
नाट्य परिषद चिपळूण कार्यालयाचे उद्घाटन
अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री सामंत यांच्या पुढाकाराने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेसाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सामंत यांचा शाखेच्यावतीने सत्कार केला. मुख्याधिकारी विशाल भोसले यांचा सन्मान केला. या वेळी आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, योगेश बांडागळे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, ज्येष्ठ कलावंत संतोष केतकर आदी उपस्थित होते.