
शेखर निकम यांचा राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीत समावेश
सावर्डे ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ३५ सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
जाहीरनामा समितीमध्ये सदस्य म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




