
कुशल ड्रायव्हरचा पुरवठा करण्यासाठी बाडेन-युटेनबर्ग राज्याचा महाराष्ट्राशी सामंजस्य करार
जर्मनीच्या बाडेन-युटेनबर्ग या राज्याला सध्या कुशल ड्रायव्हर्सची कमतरता भासतेय. त्यामुळंच कुशल ड्रायव्हरचा पुरवठा करण्यासाठी बाडेन-युटेनबर्ग राज्यानं महाराष्ट्राशी सामंजस्य करार केलाय.. त्यानुसार राज्य सरकारच्या परिवहन विभागानं आता चांगल्या ड्रायव्हर्सचा शोध घ्यायला सुरूवात केलीय…जर्मनीला कुशल ड्रायव्हर उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार कुशल ड्रायव्हर शोधण्याचे आदेश सर्व आरटीओंना पाठवण्यात आलेत. जर्मनीत काम करायला इच्छुक असलेल्यांना क्युआर कोड स्कॅन करून अर्ज भरावा लागणार आहे. जर्मनीला कुशल ड्रायव्हर उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार कुशल ड्रायव्हर शोधण्याचे आदेश सर्व आरटीओंना पाठवण्यात आलेत. जर्मनीत काम करायला इच्छुक असलेल्यांना क्युआर कोड स्कॅन करून अर्ज भरावा लागणार आहे. ड्रायव्हिंग परवान्यासह विविध कागदपत्रं अर्जासोबत जोडावी लागतील. मात्र या ड्रायव्हर उमेदवारांना जर्मन भाषा येणं बंधनकारक असणार आहे. जर्मनीत लेफ्ट हँड ड्रायव्हिंग केली जात असल्यानं त्याबाबतचे नियम उमेदवारांना माहिती असणे आवश्यक आहे.