
डॉ. मनोज चव्हाण यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार
मनसे सरचिटणीस व राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांना संपूर्ण महाराष्ट्र पाणीदूत म्हणून ओळखतो. जिथे जिथे पाण्याचे दुर्भीक्ष्य होवून टंचाई निर्माण होते. तिथे प्रशासनाच्या आधी टँकर पोहोचतो. तो पाणीदूत मनोज चव्हाण यांचा. तो ही स्वखर्चातून लंडनस्थित बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याला सलाम करत पुरस्कारही जाहीर केला आहे.ठिकाण कोकण असो वा विदर्भ वेळोवेळी अडचणीच्या काळात मेळघाटवासियांची तहान हेच भागवत असतात. म्हणूनच लोक चव्हाण यांना प्रेमाने मनसेचे प्राणीदूत म्हणून संबोधतात. यापूर्वी आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत श्रीलंकेतील प्रतिष्ठीत विद्यापीठाने डारेक्ट पदवी त्यांचा सन्मान केला. कोकणच्या सुपुत्राच्या कामाची दखल सातासमुद्रापार घेतली जातेय. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. www.konkantoday.com




