
शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील यांचा विरोध ,एकत्र बसण्याची गरज काय?
शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडली. मनोज जरांगे, मराठा समाजाचे नेते आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्याना सुचवल्याचं शरद पवार म्हणाले.शरद पवार यांच्या याच विधानाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. एकत्र बसण्याची गरज काय? सरकारला माहिती आऱक्षण कसं द्यायचं ते देत नाहीत. चर्चा करून हा नाही तो नाही आला, मग ढकलाढकली कधीपर्यंत करायची. चर्चेला बसण्याची गरज काय आहे?, असं मनोज जरांगे म्हणालेत.




