
परीट समाज भवनासाठी शासकीय भूखंड मिळावा ही मागणी मंजूर करण्याचे पालकमंत्री ना. सामंत आश्वासन
संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा, दानशूर भागोजी शेठ कीर पुतळ्यांचे महिनाभरात लोकार्पण होणार**रत्नागिरी प्रतिनिधी* : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदय जी सामंत यांनी काल दिनांक 11 ऑगस्ट रोजी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सर्व समाजाच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांना समाज भवनासाठी शासकीय भूखंड देण्याची योजना समजावून सांगितली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री अमित कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री महोदयांकडे परीट समाज भवनासाठी शासकीय भूखंड मिळण्याबाबतचे निवेदन सादर केले. त्यांनी ही मागणी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे समाजाच्या मागणीनुसार जयस्तंभ येथील कान्हेरे उद्यानात संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा आणि साळवी स्टॉप येथे दानशूर भागोजी शेठ कीर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून येत्या महिनाभरात या दोन्ही पुतळ्यांचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली या शिष्टमंडळात समाजसेवा संघाचे सचिव श्री. जितेंद्र नेरकर, कोषाध्यक्ष श्री. प्रसाद मस्के, श्री. गणेश कोरगावकर, श्री. अक्षय कातवनकर उपस्थित होते समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. प्रभाकर कासेकर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे यावेळी उपस्थित राहू न शकल्याने समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन संत गाडगेबाबा नगरातील विकास कामांच्या मागणीचे निवेदनही यावेळी सादर केले.




