हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर शेअर मार्केट गडगडले! अदानींच्या शेअर्सना मोठा फटका!!

शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आला. यामध्ये सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे अदानी ग्रुपशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. आज सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर याचा परिणाम दिसून आला. शेअर बाजार उघडताच 300 अंकांनी घसरला आहे तर निफ्टी 100 अंकांनी घसरला.हिंडनबर्गचा आरोपानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुंतवणूकदारांना जास्त जोखमी न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.शेअर मार्केटमध्ये हिंडनबर्ग रिपोर्टच्या भीतीने भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सेंसेक्स आणि निफ्टी थेट अर्ध्या अर्ध्या टक्क्यांनी खाली आला. सेंसेक्स साधारण 300 अंकानी घसरुन व्यवहावर करत होता. तर निफ्टी 24 हजार 300 च्या जवळ ट्रेड करत होता. बाजार 74 टक्के बेरीश होता. बाजाराची घंटी वाजताच सेंसेक्स 375 अकांनी कोसळून 79 हजार 330 वर खुला झाला. निफ्टी 47 अकांनी कोसळून 24 हजार 320 वर खुला झाला. बॅंक निफ्टी 72 अकांनी घसरुन 50 हजार 412 वर खुला झाला. अदानी ग्रुपच्या शेअर्सवर याचा परिणाम दिसून आला. अदानींच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली*काय आहेत हिंडनबर्गचे आरोप?*साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली. हिंडनबर्ग रिसर्चने शनिवारी 10 ऑगस्ट रोची मार्केट रेग्युलेटर सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. अदानी ग्रुपच्या ऑफशोर म्हणजेच विदेशी फंडमध्ये सेबी चेअरपर्सन माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची भागीदोरी होती, असा आरोप हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. हिंडनबर्गने हा रिपोर्ट आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला आहे. त्यानुसार सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे ती धवल बुच यांच्याकडे बरमुडा आणि मॉरिशस फंड्समध्ये स्टेक होता. याची लिंक विनोद अदांनींशी संबंधित आहे. विनोद अदानी हे दुबईत राहतात आणि ते गौतम अदानींचे मोठे भाऊ आहेत. विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतींचा अवलंब करुन विदेशी फंडमध्ये पसै लावले होते.*सेबी प्रमुखांनी काय दिले स्पष्टीकरण?*सेबीचे पद संभाळण्याच्या 2 वर्ष आधी वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट फंडमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती, असे बुच दाम्पत्याने म्हटलंय. हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये ज्या फंडचा उल्लेख करण्यात आलाय, त्यामध्ये 2015 साली गुंतवणूक करण्यात आली होती. तेव्हा आम्ही दोघे सिंगापूरमध्ये राहणारे सामान्य नागरिक होतो. माधबी यांनी सेबीची जबाबदारी संभाळण्याच्या 2 वर्षे आधी करण्यात आली होती. त्या फंडमधील मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल अहूजा हे धवल यांचे लहानपणीचे मित्र आहेत. शाळा आणि आयआयटी दिल्लीपासून त्यांची मैत्री आहे. सिटीबॅंक, जेपी मॉर्गन आणि 3i ग्रुप पीएलसीचे माजी कर्मचारी असल्याने अनेक दशकांपासून त्यांचे गुंतवणूकीचे करिअर मजबूत आहे. कोणत्याही काळात अदानी समुहाच्या कंपनीतील कोणत्याही प्रकारचे बॉण्ड, इक्विटी किंवा डेरिव्हेटीव्हमध्ये गुंतवणूक न केल्याचे अनिल अहुजा यांनी आधीच स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button