
कालच्या हल्ल्यासाठी अहमद शहा अब्दालीची तीन नेत्यांना सुपारी! संजय राऊत यांचा नाव न घेता गंभीर आरोप!!
_मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या गृहमंत्री अमित शाहांवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात आपआपसात गोंधळ करण्यासाठी अब्दालीने तीन नेत्यांना सुपारी दिली. पण काही फरक पडत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.*“ते दिल्लीच्या अब्दालीचे लोकं होते”*भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजागी स्वागत झालं. ठाण्यात झालं. सभागृह भरगच्च होतं. भगवा सप्ताह ज्या पद्धतीने साजरा व्हायला व्हावा तसा तो साजरा झाला. झालं काय? तुम्ही जे म्हणताय ना… असा एक प्रकार झाल्याचं कळलं. नंतर कळलं. काय झालं मला माहीत नाही. उद्धव ठाकरेंना माहीत नाही. ते दिल्लीच्या अब्दालीचे लोकं होते, असे संजय राऊतांनी म्हटले.*“जर तुम्ही मर्दाची औलाद असता तर…”*अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपारी दिल्या त्यातील एक सुपारी. बीडमध्ये मनसेप्रमुखाबाबत प्रकार घडला. त्यांच्या गाडीवर कुणी तरी काही फेकलं. त्याचा शिवसेनेचा काही संबंध नाही. स्थानिक लेव्हलला मराठा म्हणून आंदोलन झालं. त्याची प्रतिक्रिया आहे. पक्षाचा संबंध नाही. पण कालच्या प्रकाराला ॲक्शन रिॲक्शन म्हणता कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल. माझी त्यांना पक्षातर्फे हात जोडून विनंती आहे. तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकलं असेल म्हणून तुम्ही वाचला. जर तुम्ही मर्दाची औलाद असता तर समोर आले असते, असेही संजय राऊत म्हणाले.माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, पक्षाकडून, शिवसैनिकांकडून की, पुन्हा अशी कृत्ये अंधारात, लपूनछपून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका,. तुमच्या घरात तुमचे आईवडील वाट पाहत आहेत. तुमची मुलंबाळं वाट पाहत आहे. तुमची पत्नी वाट पाहत आहेत. या स्तरावर येत असाल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या देऊन वाट पाहत आहेत, महाराष्ट्रात आपआपसात गोंधळ करण्यासाठी अब्दालीने तीन नेत्यांना सुपारी दिली. पण काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. ठाण्यातील वातावरण बदलत आहे. विधानसभेत आमचं दमदार पडत आहे. पण त्यात अशा प्रकारे दुष्ट लावण्याचं काम अब्दालीचे लोक करतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला.*राज्यातील तीन नेत्यांना काही कोटींची सुपारी*मी कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. फक्त महाराष्ट्राचे शत्रू अब्दालीच्या इशाऱ्यावर चालले आहे. हे फडणवीस आणि शिंदेंना माहीत आहे. तुम्ही ॲक्शन रिॲक्शन काय म्हणता. थांबा दोन महिने तुम्हाला कळेल. सत्तेची मस्ती दाखवू नका. नशीब त्यांचं ते समोर आले नाही. गांडू सारखं काळोखात लपून करत आहेत. समोर असते तर शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं. मराठी लोकांमध्ये मारामारी लावण्याचं काम अब्दाली करत आहेत. त्यासाठी काही कोटींची सुपारी राज्यातील तीन नेत्यांना दिली आहे. त्यांचं काम गेल्या काही काळापासून सुपारी घेऊन केलं जात आहे, असे संजय राऊत म्हणाले.




