
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडत आहेयावेळी व्यासपीठावर असताना अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांना त्रास जाणवू लागला. डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी सुरू आहे.मनोज जरांगे पाटील यांना भाषणानंतर त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. मनोज जरांगे पाटील यांच्या हाताला अचानक कंपण सुरू झाले. घटनेनंतर तात्काळ मराठा बांधवांनी व्यासपीठावर जावुन त्यांना सावरलं. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी देखील अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.