
निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार-!काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय क्षमतेनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जात आहोत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी स्पष्ट केले.गांधीभवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत आदी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना पटोले यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.