
..तर महामार्गप्रश्नी २१ रोजी रास्तारोको, संदीप सावंत यांचा इशारा
राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे कोंडमळा, कामथे येथील प्रलंबित कामांबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी सोमवारी ग्रामस्थांसह येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत जाब विचारला. सावर्डेतील पोलीस स्थानक, तलाठी कार्यालयासह अनेक कामे प्रलंबित असून ती मार्गी न लावल्यास २१ ऑगस्ट रोजी सावर्डेतील पोलीस स्थानकासमोर रास्तारोको करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.www.konkantoday.com