
हर्णे बंदरात बिलजी मासळीचा ‘बंपर कॅच
‘ मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला हर्णे बंदरात बिलजी मासळीचा ‘बंपर कॅच’ मासेमारांच्या हाती लागला असून अपेक्षित दर मात्र या मासळीचा मिळालेला नाही. हर्णे बंदरातील मासेमारी हंगामाची सुरुवात छोट्या होड्यांनी केली असून, या होड्यांना मिळणार्या बिलजी मासळीनेच बोहणी झाली आहे.मात्र, सुरुवातीला 100 रुपये प्रतिकिलोच्या पुढे मिळणारा दर अवघा 40 वर आल्याने लहान मच्छिमार चिंतेत पडला आहे. सुरुवातीला बिलजी ला 100 च्या पुढे दर मिळत होता. हर्णे बंदरातील 50 ते 60 छोट्या होड्या सध्या पहाटे 4 वाजता समुद्रात जाऊन सकाळी 9 वाजेपर्यंत किनार्यावर येत आहेत. त्यामुळे गेले 4 दिवस मच्छी मार्केटमध्ये बिलजी मोठ्या प्रमाणात विक्रीला आलेली दिसत आहे.