
साताऱ्यातील कास पठार रस्त्यावर यवतेश्वर येथील गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी ५०० फूट दरीत कोसळून एकाचा मृत्यू
साताऱ्यातील कास पठार रस्त्यावर यवतेश्वर येथील गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी ५०० फूट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात सात जणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.या गाडीमध्ये सात जण प्रवास करत होते. ज्यापैकी इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्वजण कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आहेत.
दरम्यान फिरायला गेल्याल्या या सर्व तरुणांचा अपघातापूर्वीचा मौज करतानाचा, तसेच रस्त्यावर गाणी लावून डान्स करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही कारण या व्हिडीओनंतर या तरुणांवर काळाने घाला घातला आहे.